नृसिंहवाडी
'तिकोना' किला ट्रेक करण्यासाठी जेव्हा कॉलेजमधून निघालो तेव्हा रात्रीचे दहा वाजले असतील.तसे तर सकाळी किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचावे व दिवसभर ट्रेक करावा या उद्देशानेच सहलीचे आयोजन,डॉ.शिवाजी मस्के सर करतात.यावेळी ही असेच आयोजन केलेल.नियोजन परफेक्ट केले होते.जवळ-जवळ पंच्चेचाळीस ट्रेकर्स बरोबर होते. काही नवीन तर काही जुनेच खिलाडी.तिकोना किल्ल्याच्या पायथ्याला सकाळी सातच्या दरम्यान पोहोचलो.तिकोना गावाच्या मोकळ्या पटांगणात बस उभी केली.फ्रेश होण्यासाठी एकच बाथरूम असल्याने आंघोळीचा विषय अवघड झाला.तसेच तयार झालो.दुड्डे सरांनी मात्र लगेच ओळख काढली व तयार होऊनच आले.✌✌✌
हा ट्रेक तसा मागील ट्रेकच्या तुलनेत लहान होता.रविवार असल्यामुळे ट्रेकिंगला गर्दी होती.आज-काल समाजात ट्रेकिंग सहलिबाबत आवड निर्माण झाली आहे असे वाटते.
या किल्ल्याला 'तिकोना' नाव पडण्यामागे कारण आहे किल्ल्याची रचना. किल्ल्याची रचना त्रिकोणी आहे. त्या गावाला सुद्धा तेच नाव दिले गेले आहे.बाकी माहिती गूगल वर आहेच.
सर्वांनी किल्ल्यांचा इतिहास जाणून घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करीत लोहगड – विसापूर किल्ल्यावर शिवजयंती साजरी केली. पर्यावरणाचे संवर्धन करीत सर्व ट्रेकर 3400 फुट उंच लोहगड किल्ल्यावर पोहोचले. किल्ल्यावरील महादेवाचे दर्शन घेऊन सर्वांनी निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला. लोहगड किल्ल्यावरील शिवकालीन तोफा, लक्ष्मी कोठी, विंचू कडा, दर्गा, सोळा कोणी विहीर, गुहा, महा दरवाजा, गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा आदी ठिकाणे पाहून सर्व ट्रेकरनी एकमेकांना हात देत सुखरूप खाली उतरले.
त्यानंतर लोहगडाच्या जवळच असलेला 3556 फुट उंच विसापूर किल्ल्यावर चढाई केली. विसापूर किल्ल्यावरील महादेव व हनुमान मंदिर, गुहा, पाण्याचे तलाव, लांबवर पसरलेली तटबंदी, गडावरील एक मोठे जाते आदी ठिकाणे पहिली. यानंतर भाजे व कार्ले या प्राचीन बौद्ध लेण्यांना भेट देऊन लेण्यांची महिती घेतली.
क्लबचे समन्वयक डॉ.शिवाजी मस्के यांच्या नेतृत्वाखाली डॉ.दादासाहेब खांडेकर, डॉ.प्रवीण राजगुरू, प्रा.नागराज खराडे, प्रा.शिरीष जाधव, प्रा.युवराज सोलापुरे, भारत व्हनगावडे, संतोष फुलारी, विनायक सारंगमठ, धनंजय बच्चाव यांच्यासह विद्यार्थ्यांनी हा ट्रेक उत्साहात पूर्ण केला. यासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.राजेंद्र देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.
दिनांक 16/ 09/ 2022 रोजी सांस्कृतिक विभागाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या उद्घाटन समारंभास मा.उपप्राचार्य डी.एम.मेत्री प्रमुख पाहुणे होते. पु.अ.होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे माजी संचालक डॉ.प्रो.वसंत कोरे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. या उद्घाटन समारंभात संगमेश्वर कॉलेजच्या विद्यार्थी कलाकारांना मा.उपप्राचार्य डी.एम.मेत्री यांनी मार्गदर्शन केले.


दि 17 /10 / 2022 रोजी युवा महोत्सवात मिळवलेल्या यशाबद्दल सर्व विद्यार्थी कलाकार व मार्गदर्शक यांचा मा.प्राचार्य यांनी सत्कार आयोजित केला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या श्रीमती शोभा बोल्ली उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थी कलाकारांचे अभिनंदन केले व कलेची तारीफ केली.

सांस्कृतिक विभागाच्या यशामागे भक्कम आधार असलेल्या व सतत पुढे जाण्यास प्रोत्साहन देणाऱ्या मा.ज्योति काडादी मॅडम यांनी दि 14.10.2022 रोजी संगमेश्वर कॉलेजच्या कलाकारांचे व युथ फेस्टिवल टीम चे अभिनंदन केले.

दि 5 ते 9.11.2022 दरम्यान राहुरी कृषी विद्यापीठ राहुरी येथे आयोजित महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सव इंद्रधनुष्य 2022-23 स्पर्धेमध्ये संगमेश्वर महाविद्यालयाचा विद्यार्थी ऋतुराज व्हरकट ने स्पॉट फोटोग्राफी या कलाप्रकारात द्वितीय तर कोलाज या कला प्रकारात तृतीय क्रमांकाचे पारितोषिक व शास्त्रीय नृत्य या कलाप्रकारात संगमेश्वर महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.उर्मी कुलकर्णी हिने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठाला मिळवून दिले.

डी.पी.बी.दयानंद शिक्षण शास्त्र महाविद्यालय सोलापूर व रोटरी क्लब ऑफ सोलापूर प्राईड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पथनाट्य स्पर्धेत संगमेश्वर स्वायत्त्य महाविद्यालय सांस्कृतिक विभाग सोलापूर राज्यातून प्रथम क्रमांक पटकावले. संगमेश्वर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आजाद का अमृत महोत्सव या विषया अंतर्गत ‘गांधी अजूनही का मरत नाहीत’ या विषयावर पथनाट्य सादरकरीत प्रथम क्रमांक मिळवला. या पथनाट्यमध्ये ऋषिकेश शिवशेट्टी, वंशिका व्यवहारे,अनिकेत फताटे,सई दरेकर, गौरव सुरवसे, महेश स्वामी,रेवती परकाळे, अस्मिता मग्गिड, मनोज घोरपडे आदी कलाकारांनी सहभाग घेतला होता. यांना मार्गदर्शन म्हणून सांस्कृतिक विभाग प्रमुख दादासाहेब खांडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संतोष कुमठाळे, ओम प्रकाश साळुंखे, प्रसाद विभुते, धनराज मदगोंड आदी प्रशिक्षकांचे सहकार्य लाभले. या विद्यार्थ्यांचे संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा.धर्मराज काडादी, संगमेश्वर कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. राजेंद्र देसाई यांनी अभिनंदन केले...!!!

सांस्कृतिक विभाग
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर
युवा महोत्सव 2022
सर्वसाधारण द्वितीय
(उपविजेता) संघ
संगमेश्वर कॉलेज,
सोलापूर
( स्वायत्त )
एकूण बक्षीस संख्या
12
ललित कला विभाग
|
अ. क्र. |
कलाप्रकारचे नाव |
पारितोषिक |
विद्यार्थ्यांचे नाव |
|
1. |
कातर काम |
तृतीय |
ऋतुराज व्हरकट |
|
2. |
भित्ति चित्र |
प्रथम |
ऋतुराज व्हरकट |
|
3. |
स्थळ चित्रण |
द्वितीय |
ऋतुराज व्हरकट |
|
4. |
स्पॉट फोटोग्राफी |
द्वितीय |
ऋतुराज व्हरकट |
|
5. |
निर्मिती चित्र |
तृतीय |
ऋतुराज व्हरकट अनिकेत फताटे,अनिकेत जमदाडे, प्राची डोंगरे |
नृत्य विभाग
|
अ. क्र. |
कलाप्रकारचे नाव |
पारितोषिक |
विद्यार्थ्यांचे नाव |
|
1. |
शास्त्रीय नृत्य |
प्रथम |
उर्मी कुलकर्णी |
वाङमय विभाग
|
अ. क्र. |
कलाप्रकारचे नाव |
पारितोषिक |
विद्यार्थ्यांचे नाव |
|
1. |
मराठी वकृतव |
प्रथम |
श्रेया माशाळ |
|
2. |
मराठी कथाकथन |
प्रथम |
श्रेया माशाळ |
वाङमय विभाग
|
अ. क्र. |
कलाप्रकारचे नाव |
पारितोषिक |
विद्यार्थ्यांचे नाव |
|
1. |
समूहगीत |
प्रथम |
सलोनी पानपाटील, दिया सालोटगीमठ, प्राची डोंगरे,नमिता पाटिल, गायत्री
चराटे |
नाटय विभाग
|
अ. क्र. |
कलाप्रकारचे नाव |
पारितोषिक |
विद्यार्थ्यांचे नाव |
|
1. |
एकांकिका उत्कृष्ट अभिनय |
द्वितीय |
अनिकेत जमदाडे |
|
2. |
उत्कृष्ट दिग्दर्शन |
प्रथम |
ऋतुराज व्हरकट |
|
3. |
एकांकिका |
द्वितीय |
अनिकेत जमदाडे, सरयू देशमुख,
ऋतुजा डीगे, ऋषिकेश शिवशेट्टी,सई दरेकर, बसवराज बेरे, आदित्य पांडये, अनिकेत फताटे, प्रज्योत म्हेत्रे. |
प्रा.डॉ.दादासाहेब
खांडेकर
समन्वयक, सांस्कृतिक विभाग