किल्ले रतनगड
अनेक लोक गड-किल्ले वर ट्रेकिंग का करतात ? हा प्रश्न ज्यांना पडतो त्यांनी एकदा किल्ले ट्रेक जरूर करून पहावा..!
आमच्या कॉलेज द्वारे 2020 ला ट्रेकिंग क्लबची स्थापना करण्यात आली.क्लबचे सर्वेसर्वा आहेत डॉ.शिवाजी मस्के.मस्के सरांनी पहिला ट्रेक तापोळा किल्ल्यावर आयोजित केला.त्यावेळी सरांनी मला आग्रह केला पण रात्री जायचे दिवसभर चालायचे आणि पुन्हा रात्री परत यायचे.म्हणजे खूप दमछाक होणार, म्हणून मी नकार दिला.त्यावेळी म्हणजे 2020 ला 45 विद्यार्थी व प्राध्यापक ट्रेक यशस्वी करून आले आणि ट्रेकिंगचा आनंद व्यक्त करू लागले.माझ्याही मनात ट्रेक करण्याची इच्छा निर्माण झाली व मी 2021 ला पहिला ट्रेक किल्ले रतनगड येथे केला.
रात्री किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचलो.सकाळी नाष्टा केला आणि निघालो.पहिली चढण खूप जाचली पण नंतर मात्र सुसाट सुटलो ते किल्ल्याच्या टोकावरच थांबलो.एक अद्वितीय,अद्भुत आनंद मिळाला.आत्मविश्वास आला. समुहाबरोबरचा सहवास,निसर्ग सौंदर्य सगळ्या गोष्टी कशा शरीरात आणि मनात नवीन ऊर्जा निर्माण करतात.
किल्ले रतनगडच्या पायथ्याला छोटी - छोटी हॉटेल्स आहेत.एक सुंदर मंदिर आहे.एक पुरातन तलाव.खूप सुंदर जागा आहे ती.अगदी मन प्रसन्न झालं.आपण दोनशे मैलाच्या आसपास प्रवास करून आलो आहोत असं वाटलच नाही.इथे येण्याअगोदर एका मंगल कार्यालयात थांबून आम्ही फ्रेश झालो होतो.
ट्रेकला सुरुवात केली त्यावेळी साधारणतः 9 वाजले होते.तसा आम्हाला उशीर झाला होता.पण हवेत गारवा होता.त्यामुळे उशीर जाणवला नाही.
किल्ला चढतांना कुठे ही थकवा जाणवला नाही.या किल्ल्याला काही लोखंडी पायऱ्या आहेत.त्या चढतांना काही जण घाबरले.एक जण तर वरच आला नाही. तस घाबरण्यासारख काही नाही पण ...
किल्ल्याचे अवशेष पाहून खूप काही आनंद मिळत नाही पण चढण मजा देते.
आम्ही निघतांना जेवण बरोबर घेतले होते.कॉलेजच्या मुलांबरोबर बसून जेवण केले.फोटो काढले.किल्ल्याच्या टोकावर काही मुले आणि मी गेलो.बाकी आले मधूनच परत.
मी एवढे अंतर चालू शकेल असे मला कधीच वाटले नव्हते.पण चाललो.
एका मुलीने मात्र चांगलीच गंमत केली.ती वरपर्यंत आली पण उतरतांना जी घाबरली कि नंतर डोळेच उघडेना.खरेच असे होते का?
गड किल्ल्यांवर जातांना माहिती घेवून जायला हवे.फक्त ट्रेक नको तर इतिहास सुद्धा वाचायला हवा.हा प्रदेश एकेकाळी कसा असेल.कोण कोण इथे राहिले.त्याचे महत्त्व काय?
काही का असेना लोक किल्ल्यावर सहल करीत आहे.गजबजलेल्या शहरात जाण्यापेक्षा हे कितीतरी दृष्टीने चांगले आहे.

2 Comments:
🔥
Very Nice sir
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home