Monday, October 21, 2024

#फोटोतील_मध्यभागी_नाचणारा_युवक

 #फोटोतील_मध्यभागी_नाचणारा_युवक

विद्यापीठाच्या 2022 च्या 18 व्या युवा महोत्सव मध्ये 51 अंकासह उपविजेता चषक कॉलेजला प्राप्त झाला. 19 व्या महोत्सवाची तयारी करीत असतांना काही विद्यार्थ्यांनी एक सल्ला दिला कि आपल्याला वाङ्मय कलाप्रकारात चांगली कामगिरी करायची असेल तर #जैद_अब्दुल_हसन_शेख' या कलाकार विद्यार्थ्याचा आपल्या कॉलेज मध्ये प्रवेश करायला हवा. अनिकेत,धनराज,रुद्र यांनी त्याच्याशी संपर्क सुरू केला. 'जैद' आमच्याच कॉलेजचा विद्यार्थी परंतु बारावी उत्तीर्ण झाल्यावर त्याने 'सोशल कॉलेज' मध्ये बी.ए.पदवी साठी प्रवेश घेतला. 18 व्या युवा महोत्सवात त्याने 'सोशल कॉलेज' ला अकेले के बलबुते पर पांच बक्षिसे मिळवून दिली होती. परंतु त्यानंतर तो 'शामची आई' व एका मालिकेच्या शूटिंग साठी मुंबईला गेला व तो परीक्षा देऊ शकला नाही त्यामुळे प्रथम वर्ष अनुत्तीर्ण झाला. आता त्यांचे हे वर्ष वाया जाणार होते.वर्ष वाया घालवण्यापेक्षा त्याने आमच्या महाविद्यालायात प्रवेश करावा असे त्याला मुलांनी सांगितले. प्रारंभी तो तयार नव्हताच पण नंतर तो माझ्याकडे आला. एक नम्र, नीटनेटका, हसरी मुद्रा व बोलके डोळे असलेल्या युवक अत्यंत शुद्ध आणि मधुर भाषेत माझ्याशी संभाषण करू लागला. मी त्याच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झालो. त्याला कागद पत्रे आणण्यास सांगितले व दोन दिवसांत प्रवेश पूर्ण केला.
स्वेरी येथील 19 व्या युवा महोत्सवात संपूर्ण नाट्य इव्हेंट ची जबाबदारी त्याला दिली. त्याने त्याच्या कुवतीप्रमाणे जबाबदारी पार पाडली. या युवा महोत्सवात त्याने एकूण चार बक्षिसे पटकावली परंतु तो आपल्या कामगिरिवर खुश नव्हता. मीही खुश नव्हतो. 2 गुणांनी आमचे तृतीय विजेतेपद हुकले. मी प्रचंड निराश झालो. जैद ज्या अपेक्षेने कॉलेज मध्ये प्रवेश करता झाला होता ती साध्य होताना दिसत नव्हती.
दरम्यानच्या काळात मुलीचे लग्न व इतर व्यापात मी सांस्कृतिक कार्यक्रमापासून अलिप्त झालो.
जैद सोलापुरात सांस्कृतिक कार्यक्रमात व्यस्त होता. मला ही कॉलेजसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करायचे होते. मी जैद व रुद्रला बोललो व त्या दोघांनी #संगमेश्वर_कला_महोत्सवाचे आयोजन केले. दोन दिवस दिवसभर चालणाऱ्या संपूर्ण कला महोत्सवाचे आयोजन अत्यंत सुंदर प्रकारे त्यांनी पार पाडले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जैदकडे कमालीची ऊर्जा व प्रतिभा आहे हे मला ज्ञात झाले. त्यानंतर त्याने एकट्याच्या जिवावर हुतात्मा स्मृति मंदिर मध्ये #शायराना_साहीर' हा साहिर लुधियानवी यांच्या जीवनावर आधारित देखणा कार्यक्रम आयोजित केला. सर्व जबाबदारी त्याने स्वतः पार पाडली. अगदी एक हाती कार्यक्रम पार पाडला.
मधल्या काळात आमच्या गाठीभेटी होत राहिल्या. तो अनेक कामत व्यस्त होता. घरची परिस्थिति साधारण. वडिलांचा म्युजिक स्टुडिओ सांभाळने. तो रात्र रात्र जागून कामे करतो.
या वर्षी विद्यापीठाच्या 20 व्या युवा महोत्सवाची तयारी सुरू झाली तेव्हा मी इतका उत्साही नव्हतो. माझी जैद व रुद्र बरोबर चर्चा चालू होती काय करायचे. जैदने फक्त वाङमय कला प्रकारांवर भर द्यावा ही माझी मनोमन इच्छा होती. परंतु जैदचा सारा जीव नाटकात गुंतला होता.
आणि एके दिवसी मला #दीपक_शिंदे चा कॉल आला. सर मी दीपक बोलतो. माझी इच्छा आहे कि आपण माझी 'प्रेम कि यातना' ही एकांकिका सादर करावी. त्याने जैदला मुख्य भूमिकेत ग्राह्य धरून हा प्रस्ताव ठेवला होता. त्या दोघांची त्यावर बरीच चर्चा झाली होती. परंतु मला माहीत नव्हती. नंतर जैद सुद्धा आग्रह करू लागला. माझ्या लक्षात आले कि जैद खूप उत्सुक आहे. दीपक स्किट स्पर्धेच्या निमित्ताने सोलापुरात आला होता. दिपकला बोलाऊन घेतले. माझ्याशी चर्चा केली. मी दीपक वर विश्वास टाकायला तयार नव्हतो कारण बरेच जन मला सांगत होते कि असे विषय स्पर्धेत चलात नसतात. परंतु जैद ठाम होता.
20 व्या युवा महोत्सवात या एकांकिकेने प्रथम क्रमांक मिळविला. जैद व सई दोघांना अभिनयाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. जैदला #Goldan_Boy किताब मिळाला. अर्थात त्याने सर्व इव्हेंट मध्ये खूप परिश्रम घेतले. नकला, काव्यवाचन, एकांकिका, स्किट, पथनाट्य,लावणीत त्याने न लाजता नाच्याच्या भूमिकेत नृत्य केले.
त्याने जे स्वप्न घेऊन कॉलेज मध्ये प्रवेश घेतला होता ते स्वप्न पूर्ण झाले. अर्थात त्यात कॉलेजच्या चाळीस जणांच्या टीमची मोलाची साथ होती. माझ्या मनावरचा बोजा कमी झाला.
जैदचे भविष्य अत्यंत उज्वल आहे. तो नक्कीच मराठी नाटक सिनेमा मध्ये चमकताना दिसेल. तसे नव्हे दिसत आहे. त्याचा शामची आई मधील छोटा रोल अवश्य पहा.
All reactions:
Jaid Shaikh, Sagar Rajepandhare and 29 others

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home