पाऊस
या वर्षी पावसाने चांगलाच तंगाडा लावला. कोल्हापूर करांच्या भाषेत रांडीचा कुठे गडप झाला होता समजायला मार्ग नाही. आज 24 जून. सहा जूनच्या आसपास फुकणीचा तोंड तरी दाखवत असतो. पण या वर्षी नवटाक टाकून कुठ गटारीत बेशुद्ध पडला होता त्याला आज शुद्ध आली. आज आला आहे पण भाडखाऊ पुन्हा गायब होऊ नये म्हणजे झाल.
साल्याला माहीत नाही सोलपुरात मे महिन्या मध्ये काय हाल होतात ते? या जून मध्ये मे महिना चालू असल्यासारखे झाले. पण पाऊस आला की वातावरण एकदम मस्त होऊन जाते. आल्हाददाई, शांत. पाऊस अनुभवण्यासाठी गावाकडे जायला हवे. शहरातील पावसात काही मजा नाही. पण सोलापुरातील पाऊस मला आवडतो. सोलापूर शहर लहान व छान आहे. वाहतूक कमी,रहदारी कमी. जीव रमला आहे या शहरात.

