Monday, October 21, 2024

#The_Signature_सही_स्वाक्षरी

 #The_Signature_सही_स्वाक्षरी

जेव्हा भारावलेला दर्शक,श्रोता आपल्याला सही मागतो तेव्हा त्या कलाकाराला जो आनंद मिळतो तो शब्दांत वर्णन करणे अशक्य असते. #जैद सोबत हा प्रसंग नुकताच घडून आला. जैद इंद्र धनुष्य युवा महोत्सवामध्ये सादर करण्यासाठी एकांकिकेचा सराव करत होता. प्रॅक्टिस पाहण्यासाठी हायस्कूल मधील काही विद्यार्थी आले. जैदच्या अभिनयाने ते भारावून गेले व नाटक समाप्त झाल्यावर एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्याकडे ज्याप्रमाणे Signature मागतात तशी सही मागू लागले.
खरोखरच त्याचा अभिनय त्या ताकदीचा आहे काय ??????
अर्थात त्या सही मागणाऱ्या मुलांच्या दृष्टीने तरी नक्कीच असणार. परंतु खरेच यात काही तथ्य आहे काय ? एखाद्या स्पर्धेत अभिनयाचे प्रथम प्राइज मिळाले म्हणजे तसं काही सिद्ध होत का ? खरोखरच जैद इतका प्रौढ अभिनेता आहे काय ? या एकांकिकेत सईच्या अभिनयाचा वाटा किती आहे? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.
ज्यावेळी जैद आणि दीपक मला भेटले व एकांकिकेची चर्चा केली त्यावेळी मी #लेखक_व_दिग्दर्शक_दीपक शिंदेची ती एकांकिका पहिली नव्हती. त्यामुळे ती स्पर्धेत उतरवण्याच्या योग्य आहे का नाही मला माहीत नव्हते त्यामुळे मी साशंक होतो. माझ्या मनाची द्विधा अवस्था पाहून दीपकने मला एकांकिकेची YouTube लिंक पाठवली. मी एकांकिका पहिली. एकदा,दोनदा,तीनदा आणि मग निर्णय घेतला कि ही एकांकिका सादर करायला काही हरकत नाही.
एकांकिकेचा सराव चालू झाला. परंतु इतर इव्हेंटच्या जुळवा-जुळवीच्या नादात मी एकांकिका कशी करताहेत हे पहिलेच नाही. एके दिवशी महेश एकांकिका पाहण्यासाठी आला. आम्ही एकांकिका पहात होतो. एकांकिकेत मी इतका involve झालो कि घशात दाटून आलेला दुखा:चा आवंढा लपवता येईना. मी आश्चर्यचकीत झालो कि आपण एवढे emotional कसे झालो.
खरेच हे नाटक तसे आहे काय ? हे तपासण्यासाठी मी ममताला सांगितले कि वेळ काढून एकांकिका बघ. ममता वेळ काढून आली आणि एकांकिका पाहिल्यावर म्हणाली- "काय करतोय जैद.अप्रतिम.आणि सई सुद्धा"
त्यानंतर दिपकने सत्यता तपासण्यासाठी हे नाटक कॉलेजमधील मुलांना दाखवयाला सुरुवात केली. नाटक पाहिल्यानंतर मुली हमसून रडायच्या. म्हणजे नाटक जोरात झाले यांची प्रचिती आली. दिपकाची एकांकिका, त्याने स्वतः अभिनय केलेला तरी तो जैदचा अभिनय पाहून भारावला होता. या एकांकिकेस बक्षीस मिळो अथवा न मिळो पण तिची जोरात चर्चा होणार ही सिद्ध झाले.
फेस्टिवल मध्ये एकांकिका पाहतांना अनेक जणांना रडताना आमच्या मुलांनी पाहिले. यशपाल, झाकीर तसेच अनेक कलाकार मित्रांनी एकांकिका व नाट्य कलाप्रकाराची मुक्त कंठाने प्रशंसा केली. याच सार श्रेय दीपक व श्रीपाद यांना जात. स्पर्धेत बक्षीस मिळणे कॉलेजसाठी महत्वाचे असले तरी सादरीकरणाची चर्चा होणे आवश्यक असते. कामाची तीच खरी पावती असते.
माझ्या मते जैद आणि सई पूरक काम करीत होते. सईने खूप मेहनत घेतली आणि त्याचे बक्षीस तिला मिळाले. स्त्री अभिनयात ती प्रथम आली. कॉलेजला नाट्य कला प्रकाराची ट्रॉफी मिळणे खरेच भारी होते. हे सर्व.
जैद आणि सई ने दीपकच्या एकांकिकेला सुंदर साज चढवला आहे. भविष्यात सुद्धा त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. त्यावर ते किती कष्ट घेतात हे लवकरच दिसून येईल. पुढील स्पर्धेसाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा..!!!
2019 च्या युवा महोत्सव मध्ये '#लाली' एकांकिका सादर झाली होती. या एकांकिकेतील कलाकार ' #शिवा_सरगर' ने सुंदर अभिनय केला. त्यांचे पुढे काय झाले ? त्याने कलेमध्ये काय प्रगती केली मला माहीत नाही. परंतु त्याने एका खेडूत तरुणाचा सुंदर अभिनय आविष्कार घडवून आणला होता.
या फेस्टिवल कलाकारांमधून भविष्यातील जोरदार कलाकार घडावेत हीच विद्यापीठ प्रशासनाची इच्छा असते. नाही तर फेस्टिवल झाला खेळ खल्लास..!!

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home