युवा महोत्सव 2023
युवा महोत्सव 2023
युवा महोत्सवात फक्त पाच ते सात महाविद्यालये चांगल्या तयारीने उतरतात मग बाकीच्या महाविद्यालयाला काय अडचण आहे यांचा विचार होणे आवश्यक आहे. या वर्षी चांगल्या तयारीने आलेली महाविद्यालये होती-
1.दयानंद कला व शास्त्र महाविद्याल,सोलापूर
2.शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज
3.संगमेश्वर कॉलेज,सोलापूर
4.शिवाजी महाविद्यालय,बार्शी
5.कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय,पंढरपूर
6.वालचंद इंजिनियरिंग कॉलेज, सोलापूर
7.सिंहगड इंजिनियरिंग कॉलेज सोलापूर
पु.अ.होळकर सोलापूर विद्यापीठ व काही कॉलेज सहभागी व्हायचे म्हणून सहभागी होतात. तर काही कॉलेज एक दोन चांगले कला प्रकार घेऊन येतात. म्हणजे फक्त लोकनृत्य छान करायचे बाकी नाही. किंवा एकांकिका फक्त सादर करायची. असे का होते यांची अनेक कारणे असू शकतात.
सगळे कलाप्रकार सादर करणे खूप अवघड आहे. एकूण कला प्रकारांची संख्या 39 झाली आहे. त्यासाठी लागणारे बजेट खूप मोठे झाले आहे. एवढी मुलांची फी जमा झालेली नसते त्यामुळे हा खर्च कसा करायचं असा प्रश्न कॉलेजला पडलेला आहे. जमा फी मधून विद्यापीठाला 60% रक्कम द्यावी लागते.
कलाकारांची संख्या मोठी आहे पण चांगले कलाकार खूप कमी आहेत. ग्रामीण महाविद्यालयांना कलाकार मिळत नाहीत मग युवा महोत्सवात भाग घेतला जात नाही.
एकेकाळी वालचंद शास्त्र व कला महाविद्यालयाचा युवा महोत्सवात मोठा दबदबा असायचा. जनरल चँपियन मध्ये ते हमखास असायचे परंतु या वर्षी त्यांनी सोलो इवेंट मध्येच भाग घेतला होता. महोत्सवात सहभागी महाविद्यालयाची संख्या वाढायच्या ऐवजी कमी होते आहे ही अत्यंत दुखद आहे. वालचंद कॉलेजचा नाट्य विभाग खूप तगडा होता.
जुनोनीचे मानदेश महाविद्यालय, जेउरचे भारत महाविद्यालय, टेंभुर्णीचे विठ्ठलराव शिंदे महाविद्यालय यांनी सुद्धा अंग काढून घेतले आहे. ही महाविद्यालये नाट्य कला प्रकारात खूप सुंदर काम करीत होती. मानदेश महाविद्यालयाची एकांकिका-लाली, (शिवाजी सरगर) विठ्ठलराव शिंदे महाविद्यालयची एकांकिका-कफन खूप भारी सादरीकरण केले होते व बक्षीस सुद्धा मिळविलेल. त्या एकांकिकेतील मुले नक्कीच भविष्यात चांगले कलाकार होतील अशी आशा करायला हरकत नाही. नागराज मंजुळेच्या मुलाखती ऐकतांना याच भान येत कि असेच ग्रामीण भागातील कलाकारांना योग्य प्रोत्साहन मिळाले तर त्यांना उज्ज्वल भविष्य नक्की आहे.
या वर्षी संगमेश्वर कॉलेज कडून जैद शेख ने उत्तम कामगिरी केली. एकूण चार बक्षिसे त्याने एकट्याने पटकावली. खूप गुणी आणि संवेदनशील कलाकार आहे. त्याने नुकताच प्रदर्शित झालेला शामची आई या मराठी फिल्म मध्ये काम केले आहे. तो व्यावसायिक रंगभूमि वर काम करतो. संगीत करतो. अत्यंत नम्र व प्रतिभावान कलाकार आहे हा.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home