Sunday, November 12, 2023

युवा महोत्सव 2023

युवा महोत्सव 2023

        या वर्षीचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 19 वा 'युवा महोत्सव 2023' दिनांक 10 ते 13 आक्टोबर 2023 या कालावधीत स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे आयोजित केला होता. या महाविद्यालयाचे संस्थापक मा.रोंगे सर व त्यांचा स्टाफ अत्यंत तत्पर व नम्र असल्याने सगळे नियोजन अत्यंत नेटके व छान झाले होते. कसलीच तक्रार नाही. राहण्याची, जेवणाची,वाहतूक व्यवस्था इत्यादि सोय उत्तम होती. स्टेज व्यवस्था खूप छान झाली होती. या वर्षी मला विद्यापीठाच्या कॅमेटीत काम करण्याचा योग आला. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक,डॉ.केदारनाथ काळवणे यांचा निर्णय. मला लोककला मंच दिला होता. मंच व्यवस्था, तेथील स्वयंसेवक विद्यार्थी, प्राध्यापक यांची सेवा मनाला प्रसन्न करणारी होती. 
        पहिल्या दिवसांपासून सगळे कलाप्रकार सुरळीत चालू होते. कसलीही गडबड नाही. सगळे आपापल्या कामात. मुले आपापल्या कला प्रकाराचे सादरीकरण करण्यात व्यस्त. कसलेही भांडण,तंटा,तक्रार नाही. विद्यापीठाचे कॅमेटी मेंबर आपापल्या जागी आपली ड्यूटी बजावीत होते. तसे तर विद्यापीठाचे सगळेच युवा महोत्सव विनातक्रार पार पडतात तरीही या वर्षी अत्यंत शांततेत महोत्सव चालू होता. 
        या वर्षीच्या महोत्सवाचे वैशिष्ट्य होते लोककला प्रकार. लावणी, पोवाडा, जलसा, भजन, भारुड, कव्वाली, पाश्चात्य गायन. एकापेक्षा एक भारी संगीत कलाप्रकार. महोत्सव, महोत्सव वाटावा असे लोककला प्रकार सादर झाले. या कला प्रकाराचा समावेश करण्याचा निर्णय उशिराल्याने यांची तयारी करायला वेळ मिळाला नाही. खूप कमी एंट्री होत्या. पुढील वर्षी भरपूर येतील. सादर झालेल्या लोककला प्रकारात शिवाजी कॉलेज, बार्शी., शंकरराव मोहिते कॉलेज, अकलूज., दयानंद कॉलेज, सोलापूर, संगमेश्वर कॉलेज, सोलापूर व वसुंधरा कॉलेज, सोलापूर यांची तयारी चांगली झाली होती. या कला प्रकारात शिवाजी कॉलेजने बाजी मारली. 
           सिंहगड कॉलेजच्या मुलींनी लावणी जबरदस्त सादर केली आणि प्रथम क्रमांक मिळविला. सगळे व्यावसायिक लोक. वादक, गायक, कोरियोग्राफर. खर्च भरपूर केला होता. अगदी प्रत्येक मुलीच्या मापाच्या साड्या शिवून घेतल्या होत्या असे समजले. नृत्य पाहायला मजा आली. सुदर्शन माने व त्यांच्या टीमचे अभिनंदन करायला हवे. 
https://youtu.be/VG1VDr8WiME?feature=shared 
        संगीत विभागात समूह गायन मध्ये संगमेश्वर कॉलेज ने सलग तीन वर्ष प्रथम क्रमांक मिळविला. पाश्चात्य गायन या वर्षी समावेश झालेला कला प्रकार त्यातही संगमेश्वर ने बाजी मारली व द्वितीय क्रमांक मिळीविला. वैभव केंगार यांना नेमक काय करायला हव हे सापडले आहे. 
https://youtu.be/nxkxsLhEDCM?si=Voepel_4Ya06mpd5
        नाट्य कला प्रकारात शंकरराव मोहिते महाविद्यालयाने चांगलीच बाजी मारली. उखळी एकांकिका व अभिनय प्रथम क्रमांक मिळविला. किरण लोंढे व सागर देवकुळे यांची एकांकिका वांझ, कर्मवीर भाऊराव कॉलेजची म्हातारा पाऊस, संगमेश्वर कॉलेजची Silent Scream एकांकिका जोरात होत्या. वांझ आणि Silent Scream एकांकिका बक्षीस मिळवू शकल्या नाहीत यावर विश्वास बसत नाही. संगमेश्वरच्या जैद शेख ला अभिनयाचे द्वितीय पारितोषिक मिळाले.बऱ्याच एकांकिका मी पहिल्या नाहीत त्यामुळे मी त्यावर लिहू शकत नाही. 
            नृत्य विभागाची ट्रॉफी संगमेश्वर कॉलेज ने पटकावली. लोकनृत्य प्रथम व शास्त्रीय नृत्य प्रथम. लोकनृत्यात दयानंद महाविद्यालय व शंकरराव महाविद्यालय, बुर्ला महिला कॉलेज यांनी सुंदर नृत्य प्रकार सादर केला. संगमेश्वर च्या मुलींनी जबरदस्त नृत्य केले. लय,ताल,नजाकत,चेहऱ्याचे हावभाव एकापेक्षा एक भारी होते. विशेष म्हणजे बॅलन्स सांभाळून नृत्य करणे. अफलातून नृत्य होते. नृत्य संपल्यावर चार मुली बेशुद्ध पडल्या होत्या. 
        शास्त्रीय नृत्य मध्ये शरयू देशमुख ने प्रथम क्रमांक मिळविला. गेल्या वर्षी उर्मी कुलकर्णीने प्रथम क्रमांक मिळविला होता. शास्त्रीय नृत्यात संगमेश्वर हमेशा प्रथम असते. ममता बोल्ली, नंदिता देशपांडे, श्रद्धा कुलकर्णी, उर्मी कुलकर्णी आणि शरयू देशमुख एक परंपरा झाली आहे. (लिंक मध्ये नृत्य पाहू शकता.)
https://youtu.be/gjoN52WlQ3o?si=NDM3RakwX97USw4I

क्रमशः 
  


 
        

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home