Tuesday, February 28, 2023

नृसिंहवाडी

रोज-रोज, तेच-तेच काम.खूप कंटाळा आला.कुठेतरी फिरायला जायचे.कुठे ? ऋतुजा, माथेरानला जावूया म्हणत होती.ऋषिकेश,नको म्हणत होता.अचानक मीच निर्णय घेतला.कोंकण पाहायला जाऊया ! कोंकण म्हणजे नेमके काय बघावे, याचे प्लॅनिंग करायला हवे होते.पण तसं काही न करता निघालो.एकतर सकाळी लवकर निघायला हवं होत, पण उशिरा उठलो.११ वाजले निघायला. मस्के सरांना कॉल केला. कुठ जावं ? सरांनी सांगितलेल्या रुट वरून निघालो.
      मंगळवेढा,सांगोला,सांगली,नृसिंहवाडी चे दत्त मंदिर.
    पहिल्यांदा नृसिंहपुर ला गेलो त्यावेळी सोळा सतरा वर्षांचा असेन,त्यांनतर कॉलेजमध्ये शिकत असताना एकदा गेलो असेन.ही तिसरी वेळ होती.
     साधारणतः तीस - चाळीस वर्षांपूर्वी गेलो तेव्हा इथे मंदिर सोडले तर काही नव्हते. आता एक शहर वसले आहे.किती फरक झाला आहे. मूळ मंदिर दिसत नाही.दुकाने,हॉटेल्स,लॉज,पार्किंग. सगळी सुविधा झालीय पण शांती हरवली आहे. नदीत पाणी आहे.त्यामुळे छान वाटले. एकदा गेलो तेव्हा पुर आला होता नदीला.


मंदिर दर्शन घेतले.गर्दी कमी होती.प्रसाद चालू होता,पण मुले नको म्हणतात.त्यांना नाही आवडत प्रसाद वगैरे म्हणून जेवण करावे.मग बाहेर गेलो.एका हॉटेल मध्ये जेवण केले.बरे होते, हॉटेल व जेवण.
   तिथून कोल्हापूरला निघालो.रस्ता अर्थातच Google बाबा मदतीला होतेच.
   पूर्ण सहल गाडी मुलगाच चालवणार असे चित्र आहे.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home