Monday, February 20, 2023

संगमेश्वर च्या ट्रेकर्सनी लोहगड–विसापूर किल्ल्यावर साजरी केली शिवजयंती

 



        छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून, किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व व भौगोलिक स्थिती यांचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने संगमेश्वर कॉलेजमधील ट्रेकिंग क्लबच्या वतीने लोहगड-विसापूर  किल्ल्यावर ट्रेकिंगचे आयोजन करण्यात आले होते. या ट्रेकिंगमध्ये 09 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह 37 विद्यार्थ्यांनी सहभागी होते. हे दोन्ही किल्ले यशस्वीरीत्या सर केले. या दोन्ही किल्ल्याचा इतिहास श्री. निंबाळकर या गाईडने विद्यार्थ्यांना समजावून सांगितला.

        सर्वांनी किल्ल्यांचा इतिहास जाणून घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करीत लोहगड – विसापूर  किल्ल्यावर शिवजयंती साजरी केली. पर्यावरणाचे संवर्धन करीत सर्व ट्रेकर 3400 फुट उंच लोहगड किल्ल्यावर पोहोचले. किल्ल्यावरील महादेवाचे दर्शन घेऊन सर्वांनी निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला. लोहगड किल्ल्यावरील शिवकालीन तोफा, लक्ष्मी कोठी, विंचू कडा, दर्गा, सोळा कोणी विहीर, गुहा, महा दरवाजा, गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा  आदी ठिकाणे पाहून सर्व ट्रेकरनी एकमेकांना हात देत सुखरूप खाली उतरले.

        त्यानंतर लोहगडाच्या जवळच असलेला 3556 फुट उंच विसापूर किल्ल्यावर चढाई केली. विसापूर  किल्ल्यावरील  महादेव व हनुमान मंदिर,  गुहा, पाण्याचे तलाव,  लांबवर पसरलेली तटबंदी, गडावरील एक मोठे जाते आदी ठिकाणे पहिली. यानंतर भाजे व कार्ले या प्राचीन बौद्ध लेण्यांना भेट देऊन लेण्यांची महिती घेतली. 

        क्लबचे समन्वयक डॉ.शिवाजी मस्के यांच्या नेतृत्वाखाली डॉ.दादासाहेब खांडेकर, डॉ.प्रवीण राजगुरू, प्रा.नागराज खराडे, प्रा.शिरीष जाधव, प्रा.युवराज सोलापुरे, भारत व्हनगावडे, संतोष फुलारी, विनायक सारंगमठ, धनंजय बच्चाव यांच्यासह विद्यार्थ्यांनी हा ट्रेक उत्साहात पूर्ण केला. यासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.राजेंद्र देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home