Sunday, February 26, 2023

किल्ले तिकोना सहल

        'तिकोना' किला ट्रेक करण्यासाठी जेव्हा कॉलेजमधून निघालो तेव्हा रात्रीचे दहा वाजले असतील.तसे तर सकाळी किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचावे व दिवसभर ट्रेक करावा या उद्देशानेच सहलीचे आयोजन,डॉ.शिवाजी मस्के सर करतात.यावेळी ही असेच आयोजन केलेल.नियोजन परफेक्ट केले होते.जवळ-जवळ पंच्चेचाळीस ट्रेकर्स बरोबर होते. काही नवीन तर काही जुनेच खिलाडी.तिकोना किल्ल्याच्या पायथ्याला सकाळी सातच्या दरम्यान पोहोचलो.तिकोना गावाच्या मोकळ्या पटांगणात बस उभी केली.फ्रेश होण्यासाठी एकच बाथरूम असल्याने आंघोळीचा विषय अवघड झाला.तसेच तयार झालो.दुड्डे सरांनी मात्र लगेच ओळख काढली व तयार होऊनच आले.✌✌✌

    हा ट्रेक तसा मागील ट्रेकच्या तुलनेत लहान होता.रविवार असल्यामुळे ट्रेकिंगला गर्दी होती.आज-काल समाजात ट्रेकिंग सहलिबाबत आवड निर्माण झाली आहे असे वाटते.

        या किल्ल्याला 'तिकोना' नाव पडण्यामागे कारण आहे किल्ल्याची रचना. किल्ल्याची रचना त्रिकोणी आहे. त्या गावाला सुद्धा तेच नाव दिले गेले आहे.बाकी माहिती गूगल वर आहेच.

                                           बेडसा लेणी वरील एक दृश्य 

         साधारणतः तासाभरात आम्ही किल्यावर पोहचलो असेल. म्हणजे 11 वाजता पोहचलो असेन किल्यावर.किल्ला खूप छोटा आहे. किल्यावरून दिसणार आस-पासचा भाग खूप विहंगम आहे. पवना धरणाचे बॅक वाटरचा विशाल पसारा खूपच मनोहर दिसतो. उंच डोंगर रांगा. जिथून आपण ट्रेक सुरू केला ते छोटेसे गांव.जंगल. मन प्रसन्न होते. सारा थकवा नष्ट होतो.कितीही फोटो काढले तरी मन भरत नाही. 

                                    तिकोना किल्ल्यावरील एक दृश्य 

बारा-एकच्या दरम्यान खाली आलो.जेवणासाठी बराच वेळ लागला.जेवण बरे होते.नंतर डॅम कडे निघालो.पण डॅम वर जायला परवाणगी मिळाली नाही. मग बेडसा लेणी पाहायला गेलो.
 
                                          किल्ल्यावरील महादेव मंदिर
एकंदरीत सहल छान झाली.संध्याकाळी निघालो. पुणे मार्गे सोलापूर. पुण्याच्या पुढे आल्यावर एका हॉटेलमध्ये जेवण केले. नाही,मला वाटते पांव भाजी वगैरे,काहीतरी खाल्ले व परत आलो.या सहलीत खाणे वगैरे सगळे गौण असते. मजा असते चालण्यात.  
या सहलीत धोत्रे सर,दुड्डे सर,मेटील सर, राजगुरू सर असल्याने मजा आली. 

         



        



0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home