अमलताश
एक तरुण गायक असतो.त्याचा एक म्युझिक बैंड आहे .live कार्यक्रमात अचानक एक दिवस त्याला चक्कर येते.सिद्ध होते कि ब्रेन ट्युमर आहे. Operetion होते. आता काही दिवस त्याच्याकडे शिल्लक आहेत.तो आपल्या बहिणीकडे पुण्यात सदाशिव पेठेत राहत आहे. आता त्याचे मित्र वाद्य विक्री व दुरुस्तीचे एक दुकान चालवतात. तो त्या दुकानात पार्टनर म्हणून काम करतो.आपल्या भाचीला शाळेत सोडण्याचे,घरचा किराणा,भाजीपाला इत्यादी कामे करीत दिवस जात आहेत.एके दिवशी तो एका वृद्ध स्त्रीच्या घरी पियानो दुरुस्त करण्यासाठी जातो. त्या वृद्धेला अमेरिकेत न्यायला तिची भाची आली आहे. तिला गाण्याची आवड आहे.ती त्याच्या प्रेमात पडते. काही दिवस मजेत जातात.त्याच्या आजार बळावतो.पुन्हा ऑपरेशन करणे आवश्यक असते.त्यात त्याचा मृत्यू होतो.

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home