तिकोना किल्ला
आमच्या संगमेश्वर स्वायत्त कॉलेजचा ट्रेकिंग क्लब आहे. या क्लब द्वारे वर्षातून दोन ते तीन ट्रेकिंग सहली काढल्या जातात. प्राध्यापक व विद्यार्थी मिळून साधारणतः 40-45 जणांचा ग्रुप असतो. डॉ.शिवाजीराव मस्के क्लबचे समन्वयक आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बिनधास्त असतो. सरांचा स्वभाव अत्यंत नम्र आणि helping आहे. सगळी तयारी करतात.
ट्रेकला जाताना काय काय घ्यावे ? हा प्रश्न आता राहिलेला नाही. कारण आता ट्रेकचा चांगला अनुभव आला आहे. जेवण वगैरे तर सहलीच्या फी मध्ये समाविष्ट असल्यामुळे बरोबर फक्त ट्रॅक सूट, पाण्याची बाटली, कॅमेरा, रोजच्या टॅबलेट घेतल्या की निघाला.
संगमेश्वर कॉलेजच्या मेन गेट समोर एक आलिशान बस थांबली आहे. उत्साही ट्रेकर विद्यार्थी जमले आहेत. मला कॉलेज मध्ये सोडून मुलगा गेला आहे. "आले का रे सगळे? अजुन कोण राहिले आहे?"मस्के सर विचारणा करीत आहेत.
संध्याकाळी कॉलेजचा लुक भारी दिसतो. पिवळ्या अक्षरात संगमेश्वर लिहिलेल्या इलेक्ट्रिकल बोर्ड चा रुबाब काही औरच असतो. मेन बिल्डिंग. त्यासंमोरील फवारा. नितांत सुंदर आहे ही इमारत. 💕
बस मध्ये बसण्याची व्यवस्था म्हणजे आसन व्यवस्था, सीट नंबर संहित सरांनी whatsaap वर पाठवलेली असते. आपापली सीट पकडून बसायचे. मस्त खिडकी वगैरे दिलेली असते सरांनी.
साधारणतः संध्याकाळी 10.00 च्या दरम्यान आम्ही निघालो. बस पुश बॅक सीट असल्याने निवांत झोपून प्रवास जहाल. सकाळी जाग आली तेव्हा डोंगर रांगा नजरेस पडू लागल्या आहेत. दुड्डे सरांनी विडिओ बनवणे सुरू केले आहे. सकाळी फ्रेश होण्याची व नाश्ता करण्याची व्यवस्था एका छोट्याश्या हॉटेल मध्ये केलेली आहे. तिथे एकच बाथरूम आहे. त्यामुळे थोडी निराशा झाली. काही मुलींनी आसपास मोकळ्या जागेत आपले आवरणे सुरू केले आहे. सगळे तयार होतात.
किल्ला तसा लहान आहे. सगळे आरामात चढून जाऊ शकतात. नितांत सुंदर किल्ला आहे. आम्ही त्या छोट्याशा हॉटेल मध्ये नाश्ता केला व किल्ला चढण्यासाठी निघालो.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home