सांस्कृतिक विभाग, संगमेश्वर कॉलेज,सोलापूर
🎭🎭 अहवाल 2019-20 🎭🎭
सांस्कृतिक विभाग,
संगमेश्वर कॉलेज सोलापूर.
संगमेश्वर कॉलेज मधील सांस्कृतिक विभाग नावलौकिक प्राप्त असा विभाग आहे. संगमेश्वर कॉलेजने विद्यापीठाच्या विविध सांस्कृतिक स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपला वेगळा ठसा उमटवला आहे. या महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने अनेक गुणी कलावंत गायक यांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात नावलौकिक मिळवण्यास मदत केली आहे.
दि. 31/08/2019 रोजी दरवर्षीप्रमाणे सांस्कृतिक विभागाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या उद्घाटन समारंभास झी मराठी हास्य सम्राट प्रा.दीपक देशपांडे प्रमुख पाहुणे होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.प्रो.वसंत कोरे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. या उद्घाटन समारंभात संगमेश्वर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी श्री.संगमेश्वर बिराजदार याचा राष्ट्रीय स्तरवर बक्षीस मिळवल्या प्रित्यर्थ सत्कार करण्यात आला. तसेच डॉ.वसंत कोरे यांची विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास संचालक पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. या समारंभात प्रा.दीपक देशपांडे यांनी कला व विविध अभिनयाद्वारे विद्यार्थ्यांना कलेतील बारकावे समजावून सांगितले. या समारंभात महाविद्यालयाच्या प्रज्ञा नियतकालिकास प्रथम पुरस्कार मिळाल्या या अनुषंगाने संपादक डॉ.प्रोफे.सुहास पुजारी यांचा सन्मान करण्यात आला.
या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागातील कलाकारांनी विविध स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला.
दिनांक 3 जानेवारी 2020 ला संगमेश्वर महाविद्यालयामध्ये आयोजित SAN उत्सवात विविध स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. त्यांना पथनाट्य या स्पर्धेत रु.1500 द्वितीय बक्षीस मिळाले.
तसेच दिनांक 26 फेब्रुवारी 2020 ला ब्रह्मदेव दादा माने टेक्निकल इन्स्टिट्यूट येथे आयोजित केल्या गेलेल्या पथनाट्य स्पर्धेत रु. 3000 चा प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
सोलापूर विद्यापीठातर्फे दि.19 ते 22 सप्टेंबर 2019 रोजी लोकमंगल जैविक महाविद्यालय, वडाळा येथे आयोजित सोळाव्या युवा महोत्सवात महाविद्यालयांने सहभाग नोंदविला. या युवा महोत्सवात महाविद्यालयाला खालील प्रमाणे बक्षिसे प्राप्त झाली. युवा महोत्सवातील विविध स्पर्धेसाठी महेश शिरसागर¸संतोष कुमठाळे, विश्वेश्वरय्या स्वामी, संगमेश्वर बिराजदार, केंगार सर, प्रसाद विभुते यांनी मार्गदर्शन केले.सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून डॉ.दादासाहेब खांडेकर यांनी काम पाहिले.
संगमेश्वर कॉलेज,सोलापुर
एकूण गुण 37
क्रमांक चतुर्थ
1) मुकनाट्य-प्रथम
2) पथनाट्य-तृतीय
3) नकला-तृतीय ( अभिषेक चंदोले )
4) एकांकिका-अभिनय स्त्री- द्वितीय( विशाखा चव्हाण )
5) लोकनृत्य- द्वितीय
6) समूह गायन-प्रथम
7) शास्त्रीय गायन-द्वितीय ( अपूर्वा ओक )
8) फोटोग्राफी-द्वितीय ( विपुल मिरजकर)
9) शोभायात्रा-द्वितीय (सर्व संघ)
(अभिषेक चांडोले¸ बुद्धभूषण काटे¸ रती कसबे¸ रेश्मा गौडा¸ मदीहा होटगिकर¸ प्रतीक्षा पोतदार¸ संपदा व्हनखडे¸ विपुल मिरजकर¸ ऋतुजा पवार¸ विशाखा चव्हाण¸ वैभवी घोडके¸ श्रेया मसळी¸ आरती श्रीगोंडा¸ निलिशा अक्कलवाडे¸ सुजित पवार¸ धर्मराज गौडगाव¸ रमेश गाडे¸ देवराव खजिनदार¸ निकिता पारधे¸ दिव्या सूर्यवंशी¸ हृतिक कुरले¸ प्राजक्ता धुमाळी¸ अनिकेत पाटील¸ सिद्धेश्वर मलाबदे¸ राणी ताकमोगे¸ समर्थ पत्की¸ शिवराज गंजाळे¸ श्रीधर गायकवाड¸ पियुष कुलकर्णी¸ अनिकेत कुलकर्णी¸ शिव जहागीरदार¸ रुपाली अर्धाले.)
लोकनृत्य- द्वितीय (बुद्धभूषण काटे¸ रती कसबे¸ विशाखा चव्हाण¸ वैभवी घोडके¸ श्रेया मसळी¸ निलिशा अक्कलवाडे¸ सुजित पवार¸ धर्मराज गौडगाव¸ रमेश गाडे,आरती श्रीगोंदा.)
मुकनाट्य-प्रथम (अभिषेक चांडोले¸ बुद्धभूषण काटे¸ आरती श्रीगोंडा¸ देवराव खजिनदार¸ सिद्धेश्वर मलाबदे¸ हृतिक कुरले.)
झी मराठी हास्य सम्राट प्रा.दीपक देशपांडे मार्गदर्शन करतांना.
देशपांडे सरांच्या कार्यक्रमास असी गर्दी राहणारच. खचाखच भरलेला हॉल.
पथनाट्य-तृतीय (अभिषेक चांडोले¸ बुद्धभूषण काटे¸ निलिशा अक्कलवाडे¸ देवराव खजिनदार¸ दिव्या सूर्यवंशी¸ हृतिक कुरले¸ प्राजक्ता धुमाळी¸ अनिकेत पाटील¸ निकिता पारधे¸ धर्मराज गौडगाव.)
संगमेश्वर कॉलेज¸ संघ (युथ फेस्टिवल)
समूह गायन-प्रथम (मदीहा होटगिकर¸प्रतीक्षा पोतदार¸संपदा व्हनकडे¸रती कसबे,रेश्मा गौडा.)




7 Comments:
सुंदर...👌 आणि धन्यवाद सर संधी दिल्या बद्दल.
एकदम कडक सर शब्द कमी पडतील तुमच्यासारखे सर सांस्कृतिक विभागाला असल्यामुळंच हे शक्य झालं सर तुमचा आशीर्वाद सदैव असच पाठीशी असुद्या सर
Proud to be sangmeshwar 😎
खूपच सुंदर केलं आहे सगळ ...अभिमान वाटतो मला आपल्या कॉलेज चा ..असच आपल्या कॉलेज च नाव लौकीक करा ..
It was a really great experience working with the team. The gestures, the bond we created is unforgettable. Thank you for making me part of your team and i will feel honourable to take part in further such cultural activities under khandekar sir's guidance.
Thank you.
नक्कीच
🎤🎶
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home