श्रद्धा
श्रीशैल्यम् दर्शन व पर्यटन दोन्ही उद्देश्य साध्य होतात म्हणून आम्ही श्रीशैल्यला गेलो.मे महिना.पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते.हवेत खूप उकाडा होता.आम्हाला समजेना कि इथे इतकं का गरम होतंय? शेजारीच तुंगभद्रा डैम आहे.खूप सुंदर परिसर.मंदिर तर खूप सुंदर.इथे राहण्याची सोय छान आहे.खूप मोठ्या प्रमाणात बांधकाम झाले आहे.देवस्थान श्रीमंत आहे.रूम शोधली.ac room मिळाली असती परंतु आमचे मित्र म्हणाले ac room ची आवश्यकता नाही.मला हवी होती पण दूर-दूर राहण्यापेक्षा एकत्र रहावे म्हणून साधी room घेतली आणि इथेच माती खाल्ली.
फ्रेश होऊन देवदर्शनाला गेलो.गर्दी अशी नव्हती.मेन एन्ट्री गेट समोर चप्पल स्टँड होते.फ्री.दर्शन झाल्यावर मागच्या गेट मधून बाहेर पडावे लागते.त्यामुळे चप्पल मागच्या गेटला घ्या, आम्ही तिथे पोहोच करतो,असे सांगितले.दर्शन झाले.मागच्या गेटने बाहेर पडलो.पण चप्पल नव्हती.परत आम्ही मेन गेटला आलो.तिथे सांगितले मागच्या गेटला जा.परत मागच्या गेटला गेलो.तिथे चप्पल होती.एकूण दहा जोड.एक लहान मुलगा एका बॅगेत चपला घेऊन वाट पहात बसला होता.त्याला आम्ही काय बोलतोय कळत नव्हतं आणि आम्हाला त्याची भाषा.त्यामुळे सगळा घोळ झालेला.पण एका भाविकाला हेलफाटे घातले याचा राग आलेला.त्याने तो राग त्या लहान मुलावर काढला.मुलगा अत्यंत प्रामाणिकपणे आमची वाट पहात बसलेला पण त्याच्यावर आळ घेतला कि तो चप्पल चोरण्याच्या बहाण्याने गप्प होता.मुलाचा चेहरा पाहून मला खूप दया आली.मी त्याला 50रू काढून दिले.तो घेता घेत नव्हता.
प्रसाद घेतला.रूम वर गेलो.दहा वाजले होते.दिवसभर प्रवास करून दमलो होतो.झोपलो.पण झोप कसली येते.भयंकर गरम व्हायला लागले.असे गरम कधी झाल्याचे आठवत नाही.रात्रीचे तीन वाजले झोप नाही.शेवटी ओला टॉवेल अंगावर घेतला मग झोप आली.रात्र भयंकर होती.उद्या दिवसभर पुन्हा प्रवास करायचा होता. श्रीशै्ल पहायचे होते.

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home