संस्कृती-संजय कुंदन
संस्कृती
महामारी
ने नष्ट नाही होणार ही संस्कृती
महायुद्धा
ने ही नाही
ही
नष्ट होईल अज्ञानाच्या ओझ्याने
अज्ञान
एवढे शक्तिशाली झाले होते की
की
अज्ञानी दिसणे फॅशनच नाही
तर
जगण्याची आवश्यक अट झाली होती
वैज्ञानिक
आता खूप कमी वैज्ञानिक
दाखवू
इच्छित होते
अर्थशास्त्रज्ञ
खूप कमी अर्थशास्त्रज्ञ
दाखवू
इच्छित होते
इतिहासकार
खूप कमी इतिहासकार
अनेक
पत्रकार घाबरून होते
त्यांना
फक्त पत्रकारच
समजले
जाऊ नये
ते
सगळे विदुषक दाखवू इच्छित होते
प्रत्येक
व्यक्ती आरशासमोर उभा राहून
शोधत
होता
या
प्रयत्नात एक व्यक्ती
आपल्या
मित्राचे नाव विसरला
एकाला
तर आपल्या गावाचे नाव आठवणीत राहिले नाही
बुद्धी
आणि विवेक यांना खतरनाक
जिवाणू
आणि विषाणू प्रमाणे
पाहिले
जात होते
जे भयानक रोग पैदा करू शकतात
त्यामुळे गंभीर लोकांना पाहिल्याबरोबर
नाकावर रुमाल धरण्याची पद्धत सुरू झाली होती
एके
दिवशी अज्ञान नाकापर्यंत येईल
त्यावेळी
मुक्त होण्यासाठी कोणतेही टेक्निक,कोणताही उपाय
कुणालाच
आठवणार नाही
त्यावेळी
ही विदुषकी चाळ्यापासून मागे हटणार नाहीत काही लोक
एक
विद्रूप हास्य होईल
त्यानंतर
अंतहीन शांतता पसरेल
हिंदी कवी- संजय कुंदन ०५/ ०४/ २०२०
मराठी अनुवाद- दादासाहेब खांडेकर
ही कविता फेसबुक वर वाचली.वर्तमान राजकीय व सामाजिक स्थितीवर यथार्थ प्रकाश टाकणारी ही कविता. वेळीच सावध न झाल्यास येणारी भयाण स्थिती नेमकी कशी असेल याची जाणीव करून देणारी.कवी कुंदन सरांना मेसेज केला आणि कवितेचा अनुवाद पोस्ट करण्याची परवानगी दिल्यावरच ही कविता पोस्ट करीत आहे.
कवी कुंदन सर हे नवभारत टाइम्स चे सहाय्यक संपादक आहेत.त्यांचे मूळ गाव पटना असून ते सध्या गाजियाबाद येथे कार्यरत आहेत व निवासी आहेत.त्यांच्या अनेक कविता प्रसिद्ध झाल्या आहेत.

2 Comments:
अच्छी शुरुवात..
धन्यवाद सर..
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home